शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श नगरात घरांना पाण्याचा वेढा कायम...

By admin | Updated: July 12, 2016 00:08 IST

आदर्शनगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये असलेल्या सहा घरांच्या समोरील सात फुटाच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यामुळे येथील रहिवासी साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांना पाण्यातूनच मार्ग काढून घरात जावे लागत होते.

आदर्शनगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये असलेल्या सहा घरांच्या समोरील सात फुटाच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यामुळे येथील रहिवासी साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांना पाण्यातूनच मार्ग काढून घरात जावे लागत होते.

पाऊस थांबण्याची प्रतीक्षा....
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठ व इतर व्यवहारांवर परिणाम होण्यासह अनेकांना कामानिमित्त बाहेर पडता येत नसल्याने हा पाऊस थांबण्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. त्यात भीजपावसामुळे अनेक भागात रस्ते चिखलमय झाल्याने आता पावसाने विश्रांती घेण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणू लागले आहे.

शहरात ५५ मि.मी. पावसाची नोंद....
शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली येथील पर्जन्यमापकानुसार सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शहर व परिसरात ५५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत ४३.८ मि.मी. पाऊस झाला व त्यानंतर आठ तासात १२ मि.मी. पावसाची त्यात भर पडून तो दुपारी तीनपर्यंत ५५ मि.मी. पर्यंत पोहचला.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसरत....
रविवारी सु˜ी असल्याने पावसामुळे काही अडचण जाणवली नाही, मात्र सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात जाणार्‍यांसह शाळा, महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांना पावसामुळे ताटकळत रहावे लागले. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर अनेक जण रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडले.