'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:00 IST2025-07-15T14:59:29+5:302025-07-15T15:00:00+5:30
'शुक्ला जी' यांच्या ऐवजी कुण्या दलित व्यक्तीलाही पाठवता आले असते, असे उदित राज यांनी म्हटले आहे.

'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये (ISS) जवळपास दोन आठवडे राहिल्यानंतर कॅप्टन शुभांशू शुक्ला पुन्हा पृथ्वीवर परतत आहेत. ते मंगळवारी पृथ्वीवर लँड करण्याची शक्यता आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी, अंतराळ मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला यांच्या निवडीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. 'शुक्ला जी' यांच्या ऐवजी कुण्या दलित व्यक्तीलाही पाठवता आले असते, असे उदित राज यांनी म्हटले आहे.
उदित राज म्हणाले, "मी शुभेच्छा देतो की, त्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा आणि त्यांनी तेथे जे ज्ञान प्राप्त केले आहे, ते येथे येऊन वाटावे. आम्हाला त्याचा फायदा व्हावा. ही मानवतेसाठी लाभाची गोष्ट आहे. यापूर्वी, राकेश शर्मा यांना पाठवण्यात आले होते. तेव्हा एससी एसटी लोक एवढे शिकलेले नव्हते. मला वाटते, यावेळी संधी होती. एखाद्या मागास, एखाद्या दलित व्यक्तीला पाठवायला हवे होते. एखादी परीक्षा देऊन तर गेले नाही अथवा ना नासामध्ये एखाद्या परीक्षेनंतर त्यांची निवड झाली. एखाद्या दलित व्यक्तीलाही शुक्ला जींच्या ऐवजी पाठवले जाऊ शकते."
केव्हापर्यंत परतणार शुभांशू शुक्ला? -
अॅक्सिओम-04 मोहिमेअंतर्गत आयएसएसमध्ये गेलेले चार अंतराळवीर, शुभांशू शुक्ला (भारत), पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोज उजनांस्की-विस्निव्हस्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) हे सोमवारी स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयान आयएसएसवरून साधारणपणे दुपारी ४.३० वाजता पृथ्वीच्या दिशेने मिघाले आहेत. हे अंतराळयान आज १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळ उतरण्याची शक्यता आहे.