शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आठ नावांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: December 3, 2014 03:49 IST

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातील भाजपाच्या मंत्र्यांच्या नावाची चर्चा पूर्ण झाली असून, त्या नावांवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केले

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातील भाजपाच्या मंत्र्यांच्या नावाची चर्चा पूर्ण झाली असून, त्या नावांवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केले असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र रात्री उशिरापर्यंत त्यावर मंजुरी कळविली नव्हती. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात २० मंत्र्यांना शपथ दिली जाण्याचे संकेत आहेत. यातील १२ शिवसेनेचे व ८ भाजपाचे असतील. भाजपा समर्थित २ अपक्षांनाही स्थान देण्यावर उभयपक्षी चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याचे समजते. अपक्षांच्या नावाचा विचार अधिवेशनानंतरही केला जाऊ शकतो, असा प्रस्ताव पुढे आला आहे. नागपूरमार्गे मंगळवारी राजधानीत दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांच्याशी दोन तास चर्चा केल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बंगला गाठला. गडकरी त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. त्यामुळे त्यांची त्यांनी वाट बघितली. त्यांच्या भेटीमध्ये काही नावांवर चर्चा झाल्यावर फडणवीस यांनी मोदी यांची भेट ठरविल्याचे सूत्राने सांगितले. भाजपाच्या कोट्यातून रामदास आठवले यांच्या गटाला राज्यमंत्रिपद मिळणार आहे, मात्र ते स्वीकारण्याचा निर्णय आठवले यांनाच करायचा आहे. दिवसभराच्या वेगवान घडामोडींनी शिवसेनेत उत्साह आला असून, भाजपाबद्दल कोणतीही भूमिका विचारपूर्वक मांडण्याच्या स्पष्ट सूचना संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयात देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी नागपूर दौरा होता. मात्र शिवसेना सकारात्मक पावले उचलत असल्याचे दिसल्याने त्यांना दिल्लीला बोलाविण्यात आले. चारच्या दरम्यान त्यांनी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात शहा यांची भेट घेतली, त्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.