शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या सोडतीचा मूहूर्त १३ जुलैनंतर २५ टक्के प्रवेश : ५७ अर्ज प्रलंबित

By admin | Updated: July 12, 2016 00:09 IST

जळगाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही.

जळगाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही.
यामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर पाणी फिरले. शिक्षण विभागाने नोटिसा देऊनही काही संस्था जुमानत नसल्याने हा प्रकार घडत आहे. या प्रक्रियेतून २२०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यायचा आहे. परंतु अद्याप फक्त १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. इतर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत काढायची आहे. परंतु या प्रक्रियेतून आलेले मागील सोडतीचे प्रलंबित अर्ज निकाली निघणार नाही तोपर्यंत ही सोडत काढणे शक्य नाही.

बैठकही बेदखल
दुसरी सोडत मागील अर्ज प्रलंबित असल्याने आणि काही शाळा ऑनलाईन माहिती भरत नसल्याने काढता येत नाही. प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, असे आदेश ३० जून रोजी मु.जे.महाविद्यालयात झालेल्या २५ टक्के प्रवेश आढावा बैठकीत शिक्षण विभागाने दिले होते. तसेच या प्रक्रियेबाबत चालढकल करणार्‍या संस्था, शाळांना नोटिसा देण्यात आल्या. परंतु तरीदेखील ५७ अर्ज प्रलंबित असून, दुसरी सोडत काढण्यास विलंब होत आहे.

प्रलंबित अर्जांची माहिती : जामनेर- ३१, जळगाव- ११, भडगाव- ८, चोपडा- ६, पाचोरा-१. संबंधित शाळांना नोटिसा बजावण्याचे आदेश पुन्हा देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.

दुसरी सोडत १३जुलैनंतर
येत्या दोन दिवसात २५ टक्के प्रवेशाबाबत सोडत काढण्यात येईल, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

दोन्ही शिक्षणाधिकारी नाशिकला जाणार
ई-गर्व्हन्सबाबत बालभारतीचे अध्यक्ष ११ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथे बैठक घेत आहे. त्यात उपस्थित राहण्यासाठी दोन्ही शिक्षणाधिकारी नाशिक येथे जाणार असल्याची माहिती मिळाली.