"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:53 IST2025-10-23T09:52:15+5:302025-10-23T09:53:17+5:30
एसडीम सध्या प्रतापगड जिल्ह्यात तैनात आहेत. मात्र, भीलवाडा येथून त्यांची बदली झालेली असतानाही, ते पंप कर्मचाऱ्यांना आपण स्थानिक एसडीएम असल्याचे सांगत आहेत.

"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
सीएनजी कर्मचाऱ्यांना अधिकारीपदाचा रुबाब दाखवणे एका उपजिल्हाधिकाऱ्याला (SDM) चांगलेच महागात पडल्याची घटना घडली आहे. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील जसवंतपुरा सीएनजी पंपावर हा संपूर्ण प्रकार घडला. येथे सर्वप्रथम SDM छोटू लाल शर्मा यांनी रुबाब दाखवत CNG पंप कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. यानंतर, एका संतप्त कर्मचाऱ्यानेही पलटवार करत शर्मा यांच्या कानफटात लगावली. ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
प्रतापगड जिल्ह्यात कार्यरत असलेले SDM शर्मा २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कुटुंबासह जात असताना सीएनजी भरण्यासाठी जसवंतपुरा सीएनजी पंपावर थांबले. गाडीचे बोनट न उघडल्याने पंप कर्मचाऱ्याने दुसऱ्या गाडीत सीएनजी भरायला सुरुवात केली. यामुळे संतापलेले SDM शर्मा गाडीतून उतरले आणि कर्मचाऱ्याला आपल्या पदाचा धाक दाखवत धक्काबुक्की केली आणि त्याच्या कानशिलात लगावली.
यानंतर, दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. दरम्यान एक दुसरा कर्मचारी आपले 'बोनट' उघडे नव्हे, असे समजावण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, SDMने त्यालाही शिवीगाळ करत थापड मारली. याचवेळी त्या कर्मचाऱ्यानेही SDMच्या कानफटात दिली. SDMना थापड बसताच पेट्रोल पंपावर गोंधळ उडाला आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही समोर आले.
SDM साहब “बड़ी कुर्सी” के रौब में एक मेहनतकश कर्मचारी को थप्पड़ मार रहे हैं — मानो अफ़सर होना उन्हें किसी पर हाथ उठाने का अधिकार दे देता हो!
— Nirmal Choudhary (@NirmlChoudhary) October 22, 2025
अरे साहब, यही रौब आप उन अपराधियों पर दिखाइए, जो रोज़ कानून की धज्जियाँ उड़ा रहे हैं, न कि उस आम आदमी पर जो ईमानदारी से मेहनत कर रहा है।… pic.twitter.com/AEAs17CWIx
यानंतर अधिकारी पदाचा माज दाखवणाऱ्या SDM शर्मा यांनी लगेच पोलिसांना बोलावले आणि तीन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करवली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सत्य समोर आले. फुटेजमध्ये SDM स्वतः कर्मचाऱ्यांवर हात उगारताना स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. एसडीम सध्या प्रतापगड जिल्ह्यात तैनात आहेत. मात्र, भीलवाडा येथून त्यांची बदली झालेली असतानाही, ते पंप कर्मचाऱ्यांना आपण स्थानिक एसडीएम असल्याचे सांगत आहेत.