शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये 'सम्राट' पर्व; मुख्यमंत्रिपदाची शपथ, जदयूच्या दोन नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:24 IST

Samrat Choudhary: भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला आहे. राजभवनातील लोकभवन येथे राज्यपाल सैयद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

- एस. पी. सिन्हापाटणा -  भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला आहे. राजभवनातील लोकभवन येथे राज्यपाल सैयद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात जदयू अध्यक्ष नितीशकुमार यांचाही समावेश होता. ज्यांनी एक दिवस आधी मुख्यमंत्रिपद सोडले होते. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान हेही उपस्थित होते.

जदयूचे नेते विजेंद्रप्रसाद यादव आणि विजयकुमार चौधरी यांनीही याच प्रसंगी मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले व सांगितले की, लोकसेवेप्रती असलेली समर्पण भावना, समाजाच्या विविध स्तरांत वावरल्यामुळे मिळालेला अनुभव हे त्यांना कामे करताना उपयोगी पडेल. 

बिहारचा जलद विकास होणार : नितीशकुमारराज्यसभा सदस्य झालेले नितीश कुमार यांनी सांगितले की, सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहार जलदगतीने विकसित होईल व देशातील सर्वाधिक विकसित राज्यांच्या यादीत सामील होईल. एनडीए नेत्यांबरोबरच बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही चौधरी यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांच्या संदेशात उपरोधिक टोला होता.ते म्हणाले, लोकशाही मार्गाने ‘निवड’ झालेले आधीचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सत्तेवरून हटविण्याची प्रतिज्ञा पूर्ण केल्याबद्दल सम्राट चौधरी यांचे अभिनंदन. ते ‘नियुक्त मुख्यमंत्री’ झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Samrat Takes Oath as Bihar CM; Two JDU Leaders Sworn In

Web Summary : BJP's Samrat Choudhary became Bihar's CM, a first for the party. JDU's Vijendra Prasad Yadav and Vijay Kumar Choudhary also took oaths as ministers. Nitish Kumar expects rapid development under Choudhary's leadership.
टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड