Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार; सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ सोबत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:06 PM2021-09-01T17:06:26+5:302021-09-01T17:08:02+5:30

Maratha Reservation: भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

sambhaji raje chhatrapati to meet president ramnath kovind over maratha reservation | Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार; सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ सोबत जाणार

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार; सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ सोबत जाणार

Next

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी आता भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. यावेळी सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्यासह राष्ट्रपतींच्या भेटीवेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. (sambhaji raje chhatrapati to meet president ramnath kovind over maratha reservation)

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गुरुवार, २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ यावेळी संभाजीराजेंसोबत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

राज्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ असणार 

संभाजीराजेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने

राष्ट्रपतींकडे कुठली मागणी केली जाणार?

खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण मुद्द्यावर गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निवेदन देत होते. एवढे प्रयत्न करुनही त्यांना पंतप्रधान मोदींची भेट मिळाली नाही. मात्र, आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वेळ त्यांना मिळाली आहे. केंद्रांने नुकतीच १२७वी घटनादुरुस्ती केली आहे. नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार त्यामुळे पुन्हा राज्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपतींकडे कुठली मागणी केली जाते याकडे सर्वांच लक्ष आहे.

“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे सुरूवातीपासून आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही स्तरवर त्यांना प्रयत्न सुरु केले. मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढाईनंतर आता आंदोलन देखील सुरु करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. 
 

Web Title: sambhaji raje chhatrapati to meet president ramnath kovind over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app