शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या मतदारसंघात सामसूम

By admin | Updated: September 23, 2014 00:18 IST

पालघरच्या बहुतांशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असली तरी उमेदवारांचे अर्ज मात्र अद्याप आलेले नाहीत

दीपक मोहिते, वसईपालघरच्या बहुतांशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असली तरी उमेदवारांचे अर्ज मात्र अद्याप आलेले नाहीत. जागा वाटपावरून राष्ट्रीय पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्यामुळे उमेदवारांची यादी रखडली आहे. प्रचारासाठी कमी अवधी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही आज किंवा उद्या राष्ट्रीय पक्षांना आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करावीच लागणार. २७ तारखेला अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची भाऊगर्दी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेनेही जय्यत तयारी चालवली आहे.जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. युती व आघाडीमधील घटकपक्षामध्ये जागांवरून समझोता होणार की नाही याबाबत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार २७ तारखेला जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी प्रचाराचा धुमधडाका उडवून दिला आहे. चौकसभा तसेच व्यापारी व उद्योजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे यावर भर देण्यात आला आहे. वसई व नालासोपारा परिसरात अनेक कार्यालये उघडण्यात आली आहेत. दुसरीकडे काँगे्रस व सेनेमध्ये अद्याप शांतता असून निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.पालघर विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. या जागेवरून महायुती व आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसतानाही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. काँग्रेसतर्फे राजेंद्र गावित तर सेनेतर्फे कृष्णा घोडा यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या जागेवर मनसेतर्फेही उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मनसेने येथे उमेदवार दिला तरी सेनेला त्याचा फटका बसणार नाही. या मतदारसंघात मनसेचे अस्तित्व नगण्य आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या शंकर नम यांच्यामुळे गावित यांचा विजयाचा मार्ग सुलभ झाला होता. आता शंकर नम सेनेवासी झाले असून डहाणू मतदारसंघातून ते सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व मिळवणाऱ्या मार्क्स. कम्यु. पक्षाला यंदा बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याच पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे परुळेकर विचारमंच या सामाजिक संघटनेनेही ५ जागी आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. मार्क्स. कम्यु. पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीचा फायदा सेनेला होण्याची दाट शक्यता आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी निवडुन आलेले बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.