उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये आता मीठ घोटाळा, वरिष्ठ मंत्री पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:50 PM2020-09-16T13:50:35+5:302020-09-16T13:57:00+5:30

उत्तर प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. पशुसंवर्धन घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अजून एक घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Salt scam now in Yogi government in Uttar Pradesh, senior minister on police radar | उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये आता मीठ घोटाळा, वरिष्ठ मंत्री पोलिसांच्या रडारवर

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये आता मीठ घोटाळा, वरिष्ठ मंत्री पोलिसांच्या रडारवर

Next
ठळक मुद्देअन्न आणि पुरवठा विभागामध्ये मिठाचा पुरवठा करण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली को्ट्यवधी रुपयांची अफरातफर या घोटाळ्यामध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचाही सहभाग असल्याची शंका पोलिसांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठवण्याची केली तयारी

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन जनतेला दिले असले तरी उत्तर प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. पशुसंवर्धन घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अजून एक घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अन्न आणि पुरवठा विभागामध्ये मिठाचा पुरवठा करण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली को्ट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घोटाळ्यामध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून, याबाबतचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन घोटाळ्याप्रकरणी एसपीजी गोमतीनगर यांनी मंत्र्यांकडे चौकशी केली आहे. या दोन्ही घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आशीष राय याची मंत्र्यांच्या कार्यालयात ये-जा होती. दरम्यान, मंत्रिमहोदयांनासुद्धा या घोटाळ्याची माहिती असावी, अशी पोलिसांना शंका आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशच्या पशुपालन विभागामध्ये पीठाच्या पुरवठ्याच्या नावावर अफरातफर झाली होती. यामध्ये गुजरातमधील व्यापारी नरेंद्र पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये पत्रकार आणि अधिकाऱ्यांना पशुसंवर्धन विभागामध्ये ठेका मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागामधील या प्रकाराबाबतच्या तपासादरम्यान, अन्न आणि पुरवठा विभागातील अफरातफरही समोर आली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Web Title: Salt scam now in Yogi government in Uttar Pradesh, senior minister on police radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.