सलमानचा फैसला 28 ऑक्टोबरला

By Admin | Updated: September 6, 2014 02:37 IST2014-09-06T02:37:15+5:302014-09-06T02:37:15+5:30

1998 मधील काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याच्या दोषसिद्धीला स्थगिती देऊन त्याला दिलासा दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजस्थान उच्च न्यायालयावर टीका केली.

Salman's decision on October 28 | सलमानचा फैसला 28 ऑक्टोबरला

सलमानचा फैसला 28 ऑक्टोबरला

नवी दिल्ली : 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याच्या दोषसिद्धीला स्थगिती देऊन त्याला दिलासा दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजस्थान उच्च न्यायालयावर टीका केली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 28 ऑक्टोबर रोजी करण्याचे न्यायालयाने निश्चित केले 
आहे.
‘शिक्षा निलंबित करण्यासाठी तुमचे प्रकरण चांगले असू शकेल. परंतु दोषसिद्धीला स्थगिती देण्यासाठी निश्चितच नाही. कायदा सर्वाना सारखाच लागू झाला पाहिजे. दोषींबाबत कोणत्याही प्रकारचा पक्षपात होता कामा नये,’ असे न्या. एस. जे. मुखोपाध्याय आणि न्या. पी. सी. सावंत यांच्या पीठाने स्पष्ट केले. दोषसिद्धला स्थगितीचा अर्थ सुनावणीदरम्यान साक्षी पुराव्यांचे नव्याने आकलन करण्याचा समावेश आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.  (वृत्तसंस्था)

 

Web Title: Salman's decision on October 28