सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:56 IST2025-10-08T19:55:43+5:302025-10-08T19:56:01+5:30
Uttar Pradesh Crime News:

सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...
प्रेमविवाहामुळे नाराज असलेल्या पाच भावांनी मिळून बहीण आणि भाओजींची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे. दुखन साव आणि मुन्नी गुप्ता अशी हत्या झालेल्या पती पत्नीची नावं आहे. आरोपींनी या दोघांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे, तर तिघे जण फरार आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुन्नी गुप्ता आणि दुखन साव यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. तसेच त्यांनी कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघेही गुजरातमध्ये जाऊन राहू लागले होते. दरम्यान, तुम्ही घरी परत या, तुमचं धुमधडाक्याल लग्न लावून देतो, असं सांगून मुन्नी गुप्ता हिच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही परत बोलावून घेतलं. त्यानंतर मुन्नी गुप्ता आणि दुखन साव हे गुजरातहून मिर्झापूरला आहे. तिथे मुन्नी हिचा एक भाऊ त्यांना घेण्यासाठी आला.
ठरलेल्या योजनेनुसार मुन्नी आणि दुखन यांना गाडीत बसवून बिहारच्या दिशेने नेण्यात आले. त्यानंतर आरोपींनी हाथीनाला परिसरात काही निमित्त करून गाडी थांबवली. त्यानंतर मुन्नी आणि दुखन यांची हत्या करून मुन्नीचा मृतदेह तिथेच फेकला. तर दुखन याचा मृतदेह दुद्धी पोलीस ठाण्याच्या हद्दील असलेल्या झाडीत फेकून दिला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आता या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या पाच भावांपैकी मुन्ना आणि राहुल यांना अटक केली आहे. तर अवधेश, राकेश आणि मुकेश हे अद्याप फरार आहेत.