शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sabarimala Temple : महिलांना मिळणार का मंदिर प्रवेश?, जाणून घ्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 13:21 IST

Sabarimala Temple : महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश मिळणार का?

तिरुअनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिराचे दरवाजे आज सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले होणार आहे. मंदिराचे द्वार पारंपरिक मासिक पूजेसाठी उघडण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आज पहिल्यांदाच सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पण विरोध, मोर्चे, निदर्शनं पाहता महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार का?, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.  या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांकडून कडाडून विरोध दर्शवला जात आहे. काहींनी तर आत्महत्या करण्याचीही धमकी दिली आहे. 

सबरीमाला मंदिरसंबंधीत 10 महत्त्वपूर्ण गोष्टी1. सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या निर्णयाला वाढता विरोध पाहता सरकार आणि प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जवळपास 1 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 800 पुरुष आणि 200 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

2. काही संघटना आणि राजकीय पक्षांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत आहेत.  

3.  मंदिराचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्थान मंडळ, मंदिरातील मुख्य पुजारी व हे मंदिर ज्यांनी बांधले त्या पूर्वीच्या पंडालम राजघराण्याचे प्रतिनिधी यांच्यातील मंगळवारची बैठक निष्फळ ठरली. महिलांच्या प्रवेशाबाबत निकालापूर्वीची स्थिती कायम ठेवावी यावर आम्ही ठाम आहोत. निर्णय देवस्थान मंडळाने घ्यायचा आहे, असे सांगून राजघराण्याचे प्रतिनिधी शशीकुमार वर्मा बैठकीला गेले. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले की, न्यायालयात फेरविचार याचिका करण्याचा आम्ही आग्रह धरला; पण त्यावर 19 ऑक्टोबर रोजी बोलू, असे देवस्थानचे म्हणणे होते. बैठकीतून काही निष्पन्न होणार नाही हे नक्की झाल्याने आम्ही उठून बाहेर आलो.

4. निलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठवताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.

5. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. '', असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.

 

6.  पूजा करण्याचा अधिकार सर्व भाविकांना आहे, असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं. 

7. फेरविचार याचिका दाखल केली जाणार नाही व कोणालाही मंदिर प्रवेशास प्रतिबंध करणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले.

8. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये अनेक मोर्चे निघत आहेत. सरकार निकालाचे पालन करणार असे म्हणत असले तरी भाजपा व काँग्रेस यांनी भक्तांच्या व प्रवेशबंदीच्या बाजूने उभे आहेत.

9. केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. 

10. धक्कादायक बाब म्हणजे सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाला विरोध करणाऱ्या आंदोलकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.  

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळWomenमहिला