"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:39 IST2025-10-02T17:33:58+5:302025-10-02T17:39:17+5:30
पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा राज गिल यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर, आपण या प्रकरणाची दखल घेत असल्याचे म्हटले असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, पोलिसांनी हरजीत कौरला नोटिसही जारी केली आहे.

"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक महिला आपल्या वृद्ध सासूला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. पंजाबच्या गुरदासपुर येथील ही घटना असून, आरोपी हरजीत कौर आपल्या सासूला हाताने आणि स्टीलच्या ग्लासने मारहाण करताना दिसत आहे.
एवढेच नाही तर, ही महिला आपल्या सासूचे केस खेचत शिवीगाळ करतानाही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित सुनेचा मुलगा, चरतवीर सिंह, पंजाबीमध्ये “मम्मा, ना करा, ना करा”, असे म्हणताना दिसत आहे. मात्र, हरजीत त्याकडे दुर्लक्ष करते.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, विधवा गुरबजन कौर यांनी म्हटले आहे की, हरजीत त्यांच्यावर सर्व संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकते. तसेच, चरतवीरनेही म्हटले आहे की, त्याची आई नशेत अनेकदा त्याच्या आजीला मारहाण आणि शिवीगाळ करते. एवढेच नाही तर, आपल्याला आणि आपल्या वडिलांनाही मारहाण करते, असेही त्याने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. हरजीत कौरने आपल्या सासूला, तिच्यासोबत झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ बनवताना पकडले.
Old helpless mother was beaten up by the daughter in law in Gurdaspur . Sou Moto was issued immediately and strict action will be taken.
— Raj Gill (@rajlali) October 1, 2025
Elder’s safety , their rights and protection is commission’s priority. #RespectElders#Families#WomenSafety#PSWC#Punjabpic.twitter.com/ZCFhoDH45Q