रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 21:05 IST2025-01-21T21:04:19+5:302025-01-21T21:05:08+5:30

Russia Advance Radar System : रशियाच्या रडारमुळे पाकिस्तान-चीनसह आखाती आणि आफ्रिकन देशांवर लक्ष ठेवता येणार.

Russia Advance Radar System: Russia's radar will become India's shield; Will monitor movements at a distance of 8000 km | रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

India-Russia Relations :भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. गेली अनेक दशके भारत-रशियामध्ये व्यापार सुरू आहे. दरम्यान, या मैत्रीने आता संरक्षण क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. ब्रह्मोस मिसाइल प्रोजेक्ट, S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टीमनंतर आता भारताने आता रशियासोबत 4 अब्ज डॉलर्सचा नवीन करार केला आहे. या करारांतर्गत रशियाचे अत्याधुनिक व्होरोनेझ रडार भारतात तैनात केले जाणार आहेत. या अत्याधुनिक रडार यंत्रणेची रेंज तब्बल 8,000 किलोमीटर आहे. 

कर्नाटक राज्यात तैनात करण्यात येणार 
हे अत्याधुनिक रडार सिस्टीम 8 हजार किलोमीटर दूरवरील हल्ल्यांना परतून लावण्यास सक्षम असेल. हे रडार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात तैनात केली जाईल. हे रडार भारतासाठी ढालीप्रमाणे काम करेल. या रडारमुळे भारत फक्त पाकिस्तान आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकणार नाही, तर आखाती आणि आफ्रिकन देशांच्या हवाई क्षेत्रावरही बारीक नजर ठेवता येणार आहे.

अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियासोबत करार
अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या दबावानंतरही भारताने रशियासोबत 4 अब्ज डॉलर्सचा हा करार केला आहे. हे पाऊल भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे आणि धोरणात्मक स्वायत्ततेचे उदाहरण आहे.

व्होरोनेझ रडार प्रणालीचे वैशिष्ट्य 

8 हजार किमीचा हा रडार S-400 संरक्षण प्रणालीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या अल्माझ अँड टेक कंपनीने बनवला आहे. हे रडार स्टेल्थ फायटर जेट्स, बॅलेस्टिक मिसाईल आणि इतर हवाई धोके सहज शोधू शकते. या 8 हजार किमी श्रेणीचा भारताला अभूतपूर्व फायदा मिळतो. याद्वारे चीन आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर कोणती विमाने उडत आहेत आणि कोणती लँडिंग करत आहेत, याची अचूक आणि वास्तविक माहिती भारताला मिळू शकेल.

भारताच्या आत्मनिर्भरतेची प्रतिमा दिसेल
चीनने नुकतेच आपले पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान जगासमोर आणले आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे सामान्य रडार ही लढाऊ विमाने शोधू शकत नाही. पण व्होरोनेज त्याच्या विशेष आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे ते सहजपणे शोधू शकते. रशियाच्या व्होरोनेझ रडारच्या तैनातीमुळे भारताची आत्मनिर्भरता देखील दिसून येईल. या प्रकल्पाचे 60 टक्क्यांहून अधिक काम फक्त भारतातच केले जाईल. DRDO यात प्रमुख भूमिका बजावणार आहे.

Web Title: Russia Advance Radar System: Russia's radar will become India's shield; Will monitor movements at a distance of 8000 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.