शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:07 IST

"आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते," असेही भागवत यांनी म्हटले आहे.

अखंड भारत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाचा सर्वात महत्वाचा आणि मोठा अजेंडा राहिला आहे. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तसे तर, येणाऱ्या 20 ते 25 वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षांतच साकार होईल. याला रोखणारं कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे बोलत होते. 

भागवत म्हणाले, ज्या पद्धतीने भगवान श्रीकृषांच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचललागेला. त्याच प्रकारे, संत मंडळींच्या आशीर्वादाने भारत लवकरच पुन्हा एकदा अखंड भारत होईल. भारत उत्थानाच्या पटरीवर पुढे जात आहे. याच्या मार्गात जे येतील ते नष्ट होतील. आता भारत उत्थानाशिवाय थांबणार नाही. भारत उत्थानाच्या पटरीवर धावत आहे. तो शिटी वाजवत, उत्थानाच्या या प्रवासात सर्वांनी सोबत यावे, थांबवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, जे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करणारे आहेत, त्यांनीही सोबत यावे आणि ज्यांना सोबत यायचे नसेल त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे म्हणत आहे.

आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायलाही शिकायला हवे - भागवत म्हाणाले, आपण वेगवेगळे नाही. जर आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायला सुरुवात केली, तर  मी विश्वासाने सांगू शकतो, की ज्या गतीने भारत उत्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे, भारत अखंड होण्यासाठी केवळ 20 ते 25 वर्षांचाच कालावधी लागेल. आणि जर आपण आपला वेग वाढविला, तर हा काळ अर्ध्यावर येईल आणि असेच व्हायला हवे. एवढेच नाही, तर आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते, असेही ते म्हणाले.

मोहन भगवत हरिद्वारमधील कनखलच्या संन्यास रोड येथील श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि  गुरुत्रय मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ