शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचला १५५० कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच जळगाव जिल्‘ातून जाणार्‍या ५५ कि.मी. (वाकोद ते जळगाव) च्या रस्ते दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खडसे यांनी सांगितले.
रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी
जिल्‘ातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी.पाटील यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार केंद्र शासनाने रावेर मतदारसंघातील रावेर, पिंप्री, नांदू, नायगाव ते भोळफाटा या राष्ट्रीय मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी, सावदा, हतनूर, मानपूर, चांगदेव ते राष्ट्रीय मार्ग क्रमांक ६ पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ६ कोटी, कर्की, कोठा, बेलसवाडी, अंतुर्ली ते अंतुर्ली फाटा या रस्त्याच्या दुरस्तीसाठी ६ कोटी तसेच कळमोदा, न्हावी, हिंगोणा या रस्त्यासाठी ५ कोटी अशा एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंत कॉक्रीटीकरण
जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाला निधी मिळावा यासाठी आपण नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव मागविला आहे. एका किलोमीटरला ५ कोटी या प्रमाणे ७५ कोटी रुपयांच्या निधीला आठ ते १५ दिवसात तत्त्वता मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद-नाशिक चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी
जळगाव- औरंगाबाद रस्त्यासोबतच केंद्र शासनाने औरंगाबाद, येवला, नाशिक या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.