शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा टेहाळणी, रात्री रोहीत्र फोडण्याचा उद्योग रोहीत्राचे मायाजाल : मेहमूद शहा आहे टोळीचा मुख्य सूत्रधार

By admin | Updated: November 28, 2015 23:54 IST

क्राइम स्टोरी (मुख्य सूत्रधाराचा फोटो)

क्राइम स्टोरी (मुख्य सूत्रधाराचा फोटो)
जळगाव : रोहित्राची चोरी प्रकरणात आठ महिन्यापासून फरार असलेल्या मेहमूद शहा बिसमिल्ला शहा फकीर (वय ४०, रा.बर्‍हाणपुर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बर्‍हाणपुर येथून जेरबंद केले. दिवसा शेतात टेहाळणी करुन रोहीत्र निि›त करणे व रात्री टोळीने जावून शेतातील वीज पुरवठा बंद करुन रोहित्राची चोरी करणे ही या टोळीची काम करण्याची पध्दत होती. विशेष म्हणजे मेहमूद हा नऊ जणांच्या टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. यातील हैदर रमजान तडवी (रा.मारुळ, ता.यावल) हा अजूनही फरार आहे.
अशी आहे टोळी
मेहमूद शहा याच्या टोळीत एलीयास दिन मोहम्मद चौधरी (वय ३६, रा.अक्सा नगर, जळगाव), अकबर निजामखॉँ तडवी (वय ३०), फिरोज रमजान तडवी (वय ३२),राजवीरसिंग उर्फ राजू प्रतापसिंह चौहान (वय २८) रा.न्हावी ता.यावल, शरीफ उर्फ गजरा नशीर तडवी (वय ३५ रा.वडगाव ता.रावेर), फिरोज किताब तडवी, संजय नथ्थू तडवी (वय ३० रा.गौरखेडा ता.रावेर) व हैदर रमजान तडवी (रा.मारुळ) आदी जणांचा समावेश आहे. यातील राजवीरसिंग हा बहादुरगंज ता.करेली बाजार जि.इलाहाबाद (उत्तर प्रदेश) चा रहिवाशी आहे तर फरार असल्याचे सहायक निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले. दरम्यान फरार झाल्यानंतर मेहमूद याने बोरगाव ते कामठी या रस्त्यावर केबल टाकण्याचे काम केले.
मौल्यवान वस्तुंची चोरी
रोहीत्र व त्यातील स्टॅँपींग लोखंडी प˜्या, रोहित्राची कोर, इन्शुलेन्स पेपरने कोटींग केलेली ॲल्युमिनियम वायर, इन्शुलेन्स पेपर, ॲल्युमिनियम कॉईल्स, त्याचे रॉड आदी साहित्य चोरी केले जात होते. त्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दोन जण रस्त्यावर थांबून बाकीचे स्पॉटवर रोहीत्र फोडण्याचे काम करायचे. माल ताब्यात घेतल्यानंतर जळगाव एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये साठा केला जात होता. तेथून भंगारवाला एलियास हा त्याची विक्री करायचा.या टोळीने फैजपूर, सावदा, रावेर, यावल भागात मोठ्या प्रमाणात चोर्‍या केल्याचे उघड झाले आहे.
यांनी लावला सापळा
या गुन्‘ात मेहमूद शहा याचे नाव उघड झाल्यानंतर तो फरार होता. सहायक निरीक्षक दीपक लगड यांच्या पथकातील भास्कर पाटील, शशिकांत पाटील, मिलिंद सोनवणे, संजय पाटील, मिनल साखळीकर, छाया मराठे, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने मेहमूद शहा याच्या घरी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.