शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

"रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:45 IST

Sambit Patra News: भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला.

भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केलेल्या टीकेचा आधार घेत संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. रोहित शर्मा नाही तर राहुल गांधी अनफिट आहेत, असं विधान संबित पात्रा यांनी केलं. त्यावरून काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. अखेरीस लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाची मर्यादा राखण्याचं आवाहन दोन्ही पक्षांना केलं. त्यानंतर संबित पात्रा यांनी आपलं विधान मागे घेतलं.

लोकसभेत काल मणिपूरच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू असताना भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य करत एक टिप्पणी केली. संबित पात्रा म्हणाले की, या काँग्रेस पक्षाने सांगितलं की, रोहित शर्मा अनफिट आहे. खरंतर रोहित शर्मा अनफिट नाही आहे तर राहुल गांधी अनफिट आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत जगाच्या विजेतेपदाचा चषक पटकावेल.

संबित पात्रा यांच्या या विधानावरून लोकसभेमध्ये जोरदार राडा झाला. काँग्रेसच्या खासदारांनी संबित पात्रा यांच्या वक्तव्याला विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा तालिका अध्यक्ष असलेल्या संध्या राय यांनी हे वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून हटवण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध कायम ठेवला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सदस्यांना सांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकले नाहीत. त्यामुळा काही वेळासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यावर संबित पात्रा यांनी जर माझ्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते किंवा इतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझं वाक्तव्य मागे घेण्यास तयार आहे, असे सांगितले. 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा