शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यावरच्या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता बंद

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

हिरावाडी (कमलनगर) : महापालिकेचे दुर्लक्ष

हिरावाडी (कमलनगर) : महापालिकेचे दुर्लक्ष
पंचवटी : हिरावाडीतील (कमलनगर) येथे दर सोमवारच्या दिवशी भर वाहतुकीच्या रस्त्यावर भरणार्‍या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय भाजीविक्रेत्यांचे जाळे वाढतच चालल्याने ते थेट मुख्य रस्त्यापाठोपाठ महामार्ग रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून भरणार्‍या या भाजीबाजाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर भरणारा हा भाजीबाजार हटविणार कोण, असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांनी केला आहे.
सोमवारी रस्त्यावर भरणार्‍या आठवडे बाजारातील भाजीविक्रेते बाजार आटोपल्यानंतर भाजीपाला थेट रस्त्यावर फेकतात त्यामुळे परिसरात कचरा साचतो, शिवाय मोकाट जनावरांचाही उपद्रव वाढत आहे. रस्त्यावर भरणार्‍या या भाजीबाजारामुळे नागरिकांना वाहने नेणे सोडाच तर पायी चालणेदेखील अवघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे भरणार्‍या या भाजीबाजारामुळे सोमवारच्या दिवशी कमलनगरकडून क्रीडा संकुलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहात असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. भररस्त्यात भरणार्‍या या भाजीबाजारामुळे अपघाताची दाट शक्यता असून याबाबत महापालिकेने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे (वार्ताहर)
प्रशासनाला पत्र देणार
हिरावाडीतील कमलनगर येथे भर रस्त्यावर भरणार्‍या भाजीबाजाराबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याशिवाय नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना अडथळा सहन करावा लागतो. या बाजारामुळे अपघाताची दाट शक्यता असून, याबाबत महापालिका प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करणार आहे.
- दिनेश बर्डेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी