Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:46 IST2025-10-20T12:44:06+5:302025-10-20T12:46:04+5:30
RJD Candidates List, Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी RJD ने १४३ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. तेजस्वी यादव (राघोपूर), वीणा देवी (मोकामा) आणि चंद्रशेखर (मधेपुरा) यांना तिकीट.

Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले असताना आता विरोधकांकडूनही उमेदवार यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या यादीनंतर लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाने पहिल्या टप्प्यासाठी १४३ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये तेजस्वी यादव यांना पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राघोपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी आज ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे काही उमेदवारांची पुरती धावपळ उडणार आहे. महाआघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादामुळे RJD ने ही यादी उशिरा जाहीर केली, मात्र यापूर्वीच उमेदवारांना फॉर्म बी वाटप करण्यात आले होते. यामुळे काही उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी ज्यांची उमेदवारी बदलण्यात आली त्यांना धावपळ करावी लागणार आहे.
या उमेदवार यादीनंतर काँग्रेस आणि राजद तीन जागांवर एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वैशालीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अजय कुशवाह आणि राजदचे उमेदवार संजीव कुमार यांच्यात सामना होत आहे. लालगंजमध्ये काँग्रेस उमेदवार आदित्य कुमार आणि राजद उमेदवार शिवानी शुक्ला, सिकंदरामध्ये काँग्रेस उमेदवार विनोद चौधरी आणि राजद उमेदवार उदय नारायण चौधरी यांच्यात लढत होणार आहे.
प्रमुख उमेदवारांची नावे:
तेजस्वी यादव : RJD चा सर्वात मोठा चेहरा असलेले तेजस्वी यादव त्यांच्या पारंपरिक राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
वीणा देवी : बाहुबली नेते सूरजभान सिंह यांच्या पत्नी वीणा देवी यांना महत्त्वाच्या मोकामा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
चंद्रशेखर : त्यांना मधेपुरा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.
उदय नारायण चौधरी : ज्येष्ठ नेते उदय नारायण चौधरी हे झाझा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.