भारतातील शहरी भागात पाळीव प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. एकेकाळी घराचे रक्षक मानले जाणारे कुत्रे आणि मांजरी आता 'कुटुंबातील सदस्य' बनले आहेत. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय भारतीयांमध्ये आपल्या पाळीव प्राण्यांना स्वतःच्या मुलांसारखे जपण्याची ओढ वाढल्याने फर बेबीज ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. या भावनिक बदलामुळे देशात एक नवी पेट केअर इकॉनॉमी उभी राहिली असून या उद्योगाचे मूल्य गेल्या काही वर्षांत दुप्पट झाले आहे.
वाढते शहरीकरण, लहान कुटुंबे, उशिरा होणारी लग्ने आणि एकटेपणा यांमुळे अनेक भारतीय पाळीव प्राण्यांचा सहवास पसंत करत आहेत. मुंबईतील एका उद्योजक महिलेने सांगितले की, "माझा ४ वर्षांचा शिह त्झू मफिन माझ्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. तो माझ्यासोबत ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करतो आणि फक्त महागडे हायपोअलर्जेनिक अन्न खातो. ते माझे बाळच आहे."
पाळीव प्राण्यांच्या लाडासाठी आता लोक केवळ घरचे उरलेले अन्न न देता, सेंद्रिय आणि सानुकूलित आहार खरेदी करत आहेत. बाजारपेठेत या बदलामुळे अनेक नवीन मार्ग उघडले आहेत. लग्न आणि सणासुदीसाठी पाळीव प्राण्यांचे पोशाख, विशेष हेअर कट, स्पा, मसाज आणि निक्युअर-पेडीक्योरची सुविधा सुरू झाली आहे.
तज्ज्ञाने मते, कोरोना महामारीच्या काळात सहवासाची गरज निर्माण झाल्याने पाळीव प्राणी दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले. तरुण नोकरीपेशा महिला आणि मुले न जन्माला घालण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांनी पाळीव प्राण्यांना प्राधान्य दिले आहे. एका अहवालानुसार, २०१९ मध्ये भारतीय घरांमध्ये २६ दशलक्ष पाळीव प्राणी होते. तर, २०२४ मध्ये ही संख्या अंदाजे ३२ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.
Web Summary : Pet ownership surges in urban India, fueled by changing lifestyles and emotional needs. Pets are now family, driving a booming pet care economy. The pandemic amplified this trend, with young professionals and couples choosing pets over children. Pet adoption is on the rise.
Web Summary : शहरी भारत में पालतू जानवरों का स्वामित्व बढ़ रहा है, जो बदलती जीवनशैली और भावनात्मक जरूरतों से प्रेरित है। पालतू जानवर अब परिवार हैं, जिससे पालतू पशु देखभाल अर्थव्यवस्था बढ़ रही है। महामारी ने इस प्रवृत्ति को बढ़ाया, युवा पेशेवरों और जोड़ों ने बच्चों के बजाय पालतू जानवरों को चुना। पालतू जानवरों को गोद लेना बढ़ रहा है।