आसामात शांतता गोगोईंनी घेतला स्थितीचा आढावा

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:34+5:302014-12-28T23:40:34+5:30

गुवाहाटी : एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हिंसाचाराने पोळलेला आसाम हळूहळू पूर्वपदावर येत आहे़ हिंसाचाराची कुठलीही नवी घटना न झाल्याने आज रविवारी तेथे शांतता दिसली़

Review of the situation taken by Gogoi in peace in Assam | आसामात शांतता गोगोईंनी घेतला स्थितीचा आढावा

आसामात शांतता गोगोईंनी घेतला स्थितीचा आढावा

वाहाटी : एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हिंसाचाराने पोळलेला आसाम हळूहळू पूर्वपदावर येत आहे़ हिंसाचाराची कुठलीही नवी घटना न झाल्याने आज रविवारी तेथे शांतता दिसली़
एनडीएफबी(एस) बंडखोरांचा निष्पाप आदिवासींवरील हल्ला, या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल उसळलेला हिंसाचार आणि यादरम्यान पोलिसांचा गोळीबार यात ८१ जणांचा बळी गेल्यानंतर गत काही दिवसांपासून राज्यात तणावाची स्थिती आहे़ याचदरम्यान मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी स्थितीचा आढावा घेतला तसेच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या उपाययोजनांना गती देण्याचे आवाहन केले़ या हिंसाचारानंतर हजारो लोक मदत शिबिरात राहत आहेत़

Web Title: Review of the situation taken by Gogoi in peace in Assam