भारतातील पाक क्रिकेटपटूंच्या सुरक्षेचा आढावा घ्या - नवाझ शरीफ

By admin | Published: March 4, 2016 07:55 PM2016-03-04T19:55:02+5:302016-03-04T19:55:02+5:30

पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.

Review the safety of Pakistani cricketers in India - Nawaz Sharif | भारतातील पाक क्रिकेटपटूंच्या सुरक्षेचा आढावा घ्या - नवाझ शरीफ

भारतातील पाक क्रिकेटपटूंच्या सुरक्षेचा आढावा घ्या - नवाझ शरीफ

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - भारतात होणा-या टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणा-या पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. 
पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली यांना सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात पथक पाठवण्याची सूचना शरीफ यांनी केली आहे. आठ मार्चपासून भारतात टी-२० वर्ल्डकप सुरु होत आहे. 
भारत-पाकिस्तानमध्ये १९ मार्चला धरमशाळामध्ये होणा-या सामन्यावरुन वाद सुरु आहे. हिमाचलप्रदेश सरकारने या सामन्यासाठी  सुरक्षा देण्यासाठी असमर्थता प्रगट केली  आहे. केंद्र सरकारने या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथके पाठवण्यास  तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. 

Web Title: Review the safety of Pakistani cricketers in India - Nawaz Sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.