शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकार्‍याचा रेल्वेखाली मृत्यू

By admin | Updated: August 25, 2016 01:33 IST

जळगाव : शहरातील रेल्वे स्थानकावर न थांबणार्‍या पटना एक्सप्रेसमध्ये (अप) बसलेल्या महेश वेरूळकर (वय ४५) रा.जळगाव या महसुली अधिकार्‍याचा जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जळगाव : शहरातील रेल्वे स्थानकावर न थांबणार्‍या पटना एक्सप्रेसमध्ये (अप) बसलेल्या महेश वेरूळकर (वय ४५) रा.जळगाव या महसुली अधिकार्‍याचा जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.२ वर घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील इंद्रप्रस्थनगरमधील महेश मधुकर वेरूळकर हे भुसावळ येथील तहसील कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ते रोज जळगाव ते भुसावळ रेल्वेने अपडाऊन करतात.
सायंकाळी काम आटोपल्यानंतर ते भुसावळ येथून जळगावकडे रेल्वेने यायला निघाले. अशातच ते पटना एक्सप्रेसमध्ये बसले. ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबत नाही. ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनवर फलाट क्र. २ आली असता वेरूळकर यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचा वेग अधिक होता. वेग अधिक असल्याने वेरूळकर हे खाली कोसळले व रेल्वेखाली आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब फलाटावरील प्रवाशांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. लागलीच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दोन तास पत्ता शोधला
वेरूळकर यांच्याकडे असलेल्या बॅगेत त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड होते. त्यावरून त्यांची ओळख पटली. दोन तासानंतर त्यांच्या कुटुंबियांना शोधण्यात येऊन त्यांना ही माहिती दिली.