शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीनपीस’च्या कर्मचाऱ्याला परतवले

By admin | Updated: June 9, 2015 00:51 IST

ग्रीनपीस संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याला वैध दस्तऐवज असतानाही भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार घडल्याने नवा वाद उफाळला आहे.

नवी दिल्ली : ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण स्वयंसेवी संस्थेच्या एका प्रचारकाला विमानातून उतरविण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला असताना याच संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याला वैध दस्तऐवज असतानाही भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार घडल्याने नवा वाद उफाळला आहे.ग्रीनपीस इंटरनॅशनलचे सदस्य अ‍ॅरोन ग्रे ब्लॉक संघटनेच्या भारतातील कर्मचाऱ्यांसोबत बैठकींची मालिका पार पाडण्यासाठी शनिवारी सिडनीहून भारतात आले असता त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला.आॅस्ट्रेलियन पासपोर्टवर ते भारतात आले होते. बंगळुरू येथील स्थलांतरण अधिकाऱ्यांनी ग्रे ब्लॉक यांना प्रवेश नाकारण्याचे औपचारिक कारण दिलेले नाही. ब्लॉक यांना अधिकृतरीत्या देशाबाहेर घालविण्यात आले नाही, असा दावा ग्रीनपीस इंडियाने केला आहे. आमच्या सहकाऱ्याकडे वैध व्यावसायिक व्हिसा असतानाही भारतात प्रवेश नाकारण्यात आला असून त्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. ग्रीनपीसच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची जाचक वागणूक का दिली जात आहे, याचे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. याबाबत गृहमंत्रालय स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा असल्याचे ग्रीनपीसच्या दिव्या रघुनंदन यांनी म्हटले.पासपोर्ट घेतला ताब्यातग्रे ब्लॉक यांना भारतात प्रवेश नाकारतानाच पासपोर्ट जप्त करण्यात येऊन क्वालालंपूरच्या विमानात बसविण्यात आले. त्या ठिकाणी विमान उतरल्यानंतरच त्यांना पासपोर्ट देण्यात आला. ते पुन्हा आॅस्ट्रेलियात परतल्याचा दावा ग्रीनपीसने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)