शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

२६ जानेवारीपूर्वी हायकोर्टाचे नामांतर

By admin | Updated: December 4, 2014 03:05 IST

बॉम्बे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने सुरू केली असून, प्रजासत्ताक दिनापूर्वी हा बदल होण्याची दाट शक्यता आहे.

नवी दिल्ली : ‘बॉम्बे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने सुरू केली असून, प्रजासत्ताक दिनापूर्वी हा बदल होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नऊ वर्षांपूर्वीच राज्य सरकारने ‘मुंबई हायकोर्ट’ करण्यासाठी ना हरकत केंद्राला कळविली आहे.केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने नामांतर करण्याबाबत भारतीय संविधानातील परिशिष्ट सात मधील सूची-१ खालील नोंद क्रमांक ७८ तसेच अनुच्छेद २४६(१)अंतर्गत स्वतंत्र अधिनियम प्रस्तावित केले असून, २७ आॅगस्ट २०१२ पासून सुरू असलेल्या ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती या विभागातील सूत्राने दिली. उच्च न्यायालयाच्या बाबतीत बॉम्बेचे नामांतर मुंबई असे करण्यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने दिलेला अहवाल व राज्यातील अन्य खंडपीठातील न्यायाधीशांच्या बैठकींचे कार्यवृत्त या अहवालासोबत जोडलेले आहे. त्यानंतर राज्य सरकाने १० पत्रे केंद्राला नामांतर करण्याबाबत दिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा केंद्र सरकारला पत्रे दिली, मात्र अजूनही निर्णय रखडला आहे. आॅगस्ट महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शिवसेना खा. विनायक राऊत यांनी बुधवारी शून्य प्रहरात हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. (विशेष प्रतिनिधी)