शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:25 AM

नरेंद्र मोदींचा वरचष्मा कायम राहणार की राहुल गांधी यांचा प्रभाव वाढणार?

नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, वैयक्तिक पातळीवरील टीका यांमुळे गाजलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या, मंगळवारी लागणार असून, या निकालांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात आहे. या निकालांद्वारे मोदी व त्यांचा भाजपा पुन्हा तीन राज्यांवर आपला प्रभाव कायम ठेवणार की, काही राज्ये हातातून गेल्यामुळे काँग्रेसचा दबदबा वाढणार, हे स्पष्ट होणार आहे.उद्या सकाळी आठ वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या रिंगणात असलेल्या सुमारे ८५00 उमेदवारांचे भवितव्य ठरवणारे निकाल आता १ लाख ८४ हजार मतदान यंत्रांमध्ये बंद आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये सध्या भाजपाची सत्ता असून, ती टिकवणे भाजपासाठी महत्त्वाचे आहे. तिथे फटका बसला तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांवरही होईल, अशी भाजपा नेत्यांना भीती आहे. त्यापैकी राजस्थानमधील भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता एक्झिट पोलनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही भाजपा व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस झाल्याचे हे एक्झिट पोल सांगत असून, त्यांच्यापैकी काहींनी तिथे पुन्हा भाजपा सरकार बनवेल, असे निष्कर्ष काढले आहेत, तर काहींनी तेथील सत्ता काँग्रेसला मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्षात ही तिन्ही राज्ये काँग्रेसकडे आली, तर तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी मोठाच विजय व भाजपासाठी त्याहून मोठा पराभव असेल. कोणालाही बहुमत न मिळाल्यास तिथे आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित केल्याने तिथे निवडणुका घ्याव्या लागल्या आहेत. जवळपास सर्व एक्झिट पोलनी राज्यात पुन्हा टीआरएसच सत्तेवर येईल, असे म्हटले असले, तरी काँग्रेस अद्यापही आमचेच सरकार येईल, असा दावा करीत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील हे राज्य नेमके कोणाला साथ देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मिझोरममध्ये काँग्रेसचे सरकार असले तरी तिथे मुख्य सामना आहे काँग्रेस व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात. तिथे भाजपाला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही, असे एक्झिट पोल सांगतात. तरीही काँग्रेसविरोधी सरकार मिझोरममध्ये यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे भाजपाने म्हटले. तिथे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचे अंदाज आहेत. अशा स्थितीत काँग्रेस व अपक्ष आमदार प्रसंगी मिझो नॅशनल फ्रंटच्या मागे उभे करण्याचा प्रयत्न भाजपाने केला, तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :ElectionनिवडणूकRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी