शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, गुजरातमधून ६० कोटींची प्रतिबंधित औषधे जप्त

By admin | Updated: August 17, 2016 04:19 IST

परदेशातील नशेखोरांसाठी मुंबई, गुजरातमधून औषधांची तस्करी सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या कारवाईतून समोर आली.

मुंबई : परदेशातील नशेखोरांसाठी मुंबई, गुजरातमधून औषधांची तस्करी सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या कारवाईतून समोर आली. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी शाखेने मुंबई व गुजरातच्या औषध निर्मिती कारखान्यांवर छापे घालून तब्बल ६० कोटी रुपयांचा प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त केला आहे. मुंबईच्या ‘केसी’ तर अहमदाबादच्या ‘डॉल्फिन फार्म’चा यामध्ये समावेश आहे. या औषधांचा बेहिशोबी साठा करून तो अमेरिका, आॅस्टे्रलिया आणि लंडनमधील अंमली पदार्थ तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या टोळ्यांना दिला जात असल्याचे समोर आले. या औषधांच्या अतिसेवनाने नशा येते. त्यामुळे याचा जास्तीचा साठा ठेवण्यास एफडीएकडून परवानगी देण्यात येत नाही. असे असतानाही या कंपन्यांनी जास्तीचा साठा ठेवला होता. या साठ्यांची परदेशात तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीने या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. अहमदाबादच्या डॉल्फिन फार्म येथे झोल्पीडेम, अल्प्राझोलम आणि आॅक्सिकोडेन या औषधांच्या सुमारे ९ लाख गोळ्यांचा साठा सापडला. इतका साठा करण्याची कंपनीला परवानगी नव्हती. पुढील चौकशीत डॉल्फिनचा संचालक अनील लुहार, झाहिद शेख यांनी हा साठा अंधेरीच्या कृष्णन चौधरी तथा केसी फार्मा कंपनीकडून घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार, अहमदाबाद व मुंबई युनिटने केसी फार्मावर छापा टाकून ४७ हजार गोळ्या जप्त केल्या. या कारवाईनंतर एनसीबीने चौघांना अटक केली. चौकशीदरम्यान अमेरिका, लंडन आणि आॅस्टे्रलियामध्ये या तिन्ही औषधांना बंदी आहे. मात्र तेथील अंमली पदार्थ तस्करांना भारतातून पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही कारवायांत तब्बल ६० कोटींची औषधे हस्तगत करण्यात आली आहेत. अशी माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी एनसीबीकडून अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)