वडगाव शेरीत नागरिकांचा सन्मान

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

पुणे : समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे कौैतुक करता यावे, हा आजच्या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब चौैधरी यांनी केले. वडगाव शेरीतील साई प्रतिष्ठानतर्फे उल्लेखनीय कार्य करणा-या नागरिक, शिक्षक, शेतक-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जगदीश मुळीक, ॲड. प्रमोद आडकर, श्रीपाद सबनीस, दत्ता कोहीनकर तसेच धुळे, नाशिक,ठाणे,मुंबई व पुण्यातील शिक्षक, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Respect for the citizens of Wadgaon | वडगाव शेरीत नागरिकांचा सन्मान

वडगाव शेरीत नागरिकांचा सन्मान

णे : समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे कौैतुक करता यावे, हा आजच्या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब चौैधरी यांनी केले. वडगाव शेरीतील साई प्रतिष्ठानतर्फे उल्लेखनीय कार्य करणा-या नागरिक, शिक्षक, शेतक-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जगदीश मुळीक, ॲड. प्रमोद आडकर, श्रीपाद सबनीस, दत्ता कोहीनकर तसेच धुळे, नाशिक,ठाणे,मुंबई व पुण्यातील शिक्षक, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यातील ज्येष्ठ नागरिक सुरेश परांजपे यांनी दिवे येथील जीवनवर्धिनी निवासी विनाअनुदानित मतिमंद संस्था, आनंदवन संस्था यांच्या कामात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल जगदीश मुळीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या महिला कार्यकर्त्या निलम खानापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Respect for the citizens of Wadgaon