नोएडातील मेट्रो रुग्णालयात भीषण आग, काचा फोडून रुग्णांना काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 13:54 IST2019-02-07T13:39:29+5:302019-02-07T13:54:23+5:30

नोएडातल्या मेट्रो रुग्णालयाला भीषण आग लागली आहे.

Rescue operations underway after a fire broke out in Metro Hospital in Noida's sector-12 | नोएडातील मेट्रो रुग्णालयात भीषण आग, काचा फोडून रुग्णांना काढलं बाहेर

नोएडातील मेट्रो रुग्णालयात भीषण आग, काचा फोडून रुग्णांना काढलं बाहेर

नवी दिल्ली- नोएडातल्या मेट्रो रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. मेट्रो रुग्णालय हे नोएडातल्या सेक्टर 12मध्ये आहेत. आगीच्या घटनेनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रुग्णांना काचा फोडून बाहेर काढलं जात आहे. आग भीषण असल्यामुळे अद्यापही तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. तसेच आगीत किती जीवितहानी झाली आहे, यासंदर्भातही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या आगीत डझनांहून अधिक रुग्ण जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


सध्या तरी रुग्ण सुरक्षित आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत असून, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.




 

Web Title: Rescue operations underway after a fire broke out in Metro Hospital in Noida's sector-12