शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

कधी पंतप्रधान मोदींसोबत, तर कधी प्रमुख पाहुण्यांना माहिती देताना दिसलेला हा तरुण कोण?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 06:27 IST

Republic Day: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचालनाच्या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर उपस्थित असलेल्या परदेशी पाहुण्यांना एक तरुण विविध गोष्टींची माहिती सातत्याने देताना दिसत होता. त्यामुळे हा तरुण कोण असा प्रश्न प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.  

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवारी देशभरात उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजधानी नवी दिल्लीमध्ये संपन्न झाला. यावेळी भारताच्या सैन्यदलांनी शस्त्रास्त्रांसह आपल्या सैन्यशक्तीचं प्रदर्शन केलं तर विविध मंत्रालये आणि राज्यांच्या चित्ररथांमधून देशाचा विकास आणि सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर उपस्थित असलेल्या परदेशी पाहुण्यांना एक तरुण कर्तव्य पथावर सुरू असलेल्या संचालनातील विविध गोष्टींची माहिती सातत्याने देताना दिसत होता. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलताना तर कधी परदेशी प्रमुख पाहुण्यांना समजावून सांगत असलेला हा तरुण कोण असा प्रश्न प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.  

या तरुणाचं नाव आहे सिद्धार्थ बाबू. सिद्धार्थ बाबू हे भारतीय परदेश सेवेच्या २०१७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. तसेच ते प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. सिद्धार्थ बाबू हे कधी युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॅन डेर लेन यांच्याशी बोलताना दिसत होते. तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधत होते. ते पंतप्रधान मोदी आणि प्रमुख पाहुण्यांमध्ये अनुवादक म्हणून काम करत असल्याचे काही वेळाने प्रेक्षकांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत ते कोण आहेत आणि त्यांचं नाव काय आहे, याची माहिती कुणालाच नव्हती. दरम्यान, सिद्धार्थ बाबू हे परराष्ट्र मंत्रालयामध्ये अंडर सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते शिष्टाचार आणि अनुवादाच्या कामामध्ये नेहमी सहभागी असतात. सिद्धार्थ बाबू यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित मिडल्युरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, मॉन्टेरे  येथून भाषेचं शिक्षण घेतलं आहे. तसेच या संस्थेमध्ये केवळ भाषाच नव्हे तर मुत्सद्देगिरी आणि डिप्लोमॅटिक शिष्टाचाराचंही शिक्षण दिलं जातं.  

कोची येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थ बाबू यांनी २०१६ मध्ये आपल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसेच त्या परीक्षेत त्यांनी देशभरातून १५ वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र सेवेची निवड केली होती. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२६Indiaभारत