शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day 2018 :प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राहुल गांधींची बैठक व्यवस्था चौथ्या रांगेत, काँग्रेस तापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 12:04 IST

69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निमंत्रण दिले आहे. मात्र,  चौथ्या रांगेत त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती एका काँग्रेस नेत्यानं दिली आहे.

नवी दिल्ली - 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निमंत्रण दिले आहे. मात्र,  चौथ्या रांगेत त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती एका काँग्रेस नेत्यानं दिली आहे. दरम्यान, नेतेमंडळी आणि मंत्र्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तर दुसरीकडे,  आसन व्यवस्थेत कोणत्याही प्रकारे प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्यात आलेले नाही, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.  प्रोटोकॉलनुसार राजकीय नेत्यांचा क्रमांक प्राधान्यानुसार उतरत्या क्रमानं येतो.  विरोधी पक्षातील कित्येक दिग्गज नेतेदेखील मागील रांगेतच बसतात. सध्या विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी असल्यानं लोकसभेत विरोधी पक्षनेता नाहीय. 

नाव उघड न करण्याच्या अटीवर काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची चौथ्या रांगेत आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मोदी सरकार अतिशय घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यानं केला आहे. दरम्यान, कुठेही आसन व्यवस्था केली असली तरीही राहुल गांधी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणार असल्याचंही यावेळी काँग्रेस नेत्यानं सांगितले.

आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, अशा कार्यक्रमात काँग्रेस नेतृत्वाचा केंद्र सरकारला अपमान करायचा आहे, असा थेट आरोपच एका काँग्रेस नेत्यानं केला आहे.  काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीच्या अध्यक्षांना स्वातंत्र्यापासूनच पहिल्या रांगेत बैठकीची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. सोनिया गांधीदेखील काँग्रेस अध्यक्ष असताना नेहमीच पहिल्या रांगेत त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. 2014 मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्या रांगेत स्थान देण्यात येत आहे.  

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा