शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भेटला म्हणून नातेवाईकांनी केलं मुंडण

By admin | Updated: April 3, 2017 12:40 IST

दरियापूर परिसरात काही लोकांनी जबरदस्तीने जोधपूरमधील एका 26 वर्षीय तरुणाचे केस कापून टक्कल केलं

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 3 - दरियापूर परिसरात काही लोकांनी जबरदस्तीने जोधपूरमधील एका 26 वर्षीय तरुणाचे केस कापून टक्कल केलं. केस कापणारे दुसरे कोणाही नाही तर हा 26 वर्षीय तरुण ज्या मुलीची भेट घेण्यासाठी गेला होता त्या मुलीचे नातेवाईक होते. घटनेनंतर तरुणाने कोणतीही तक्रार करण्यास नकार दिला असल्याचं करंज पोलिसांनी सांगितलं आहे. 
 
रविवारी दुपारी काही लोक तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्याचं मुंडण केलं. या तरुणाला लोकांकडून जाब विचारला जात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. अगोदर तरुणाला दरियापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, पण घटनास्थळ करंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला करंज पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. 
 
तरुण जोधपूरचा रहिवासी असून दिल्लीत नोकरी करत असल्याचं लोकांनी सांगितलं आहे. मिर्जापूर परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये तो थांबला होता. दरियागंज परिसरात राहणा-या आपल्या मैत्रिणीला त्याने शनिवारी भेटण्यासाठी बोलावलं होतं. पण त्याआधीच मुलीच्या नातेवाईकांना त्याला पकडलं आणि जबदस्ती करत त्यांचं मुंडण केलं. 
 
"तरुण आणि तरुणी दोघेही जोधपूरचे रहिवासी आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून ते एकमेकाला ओळखतात. तरुणीच्या कुटुंबियांनी याअगोदरही त्याला तरुणीला न भेटण्याची धमकी दिली होती. मात्र तरुणी सतत त्याच्या संपर्कात होती. तिला भेटण्यासाठीच तो दिल्लीहून आला होता", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रार केल्यास काय शिक्षा होऊ शकते याची माहिती देऊनदेखील तरुणाने तक्रार करण्यास नकार दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.