'पाकिस्तानशी संबंध जोडणे ही मुख्यमंत्र्यांची सुपीक कल्पना'; गौरव गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:56 IST2026-03-26T13:56:13+5:302026-03-26T13:56:57+5:30

राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयाचे राजकारण करणे हे मुख्यमंत्र्यांच्या 'असुरक्षित' मानसिकतेचे लक्षण आहे.  

reconnecting with pakistan is a fertile idea of the cm gaurav gogoi tells Himanta Biswa Sarma | 'पाकिस्तानशी संबंध जोडणे ही मुख्यमंत्र्यांची सुपीक कल्पना'; गौरव गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना सुनावले

'पाकिस्तानशी संबंध जोडणे ही मुख्यमंत्र्यांची सुपीक कल्पना'; गौरव गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना सुनावले

जोरहाट : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्यातील वाद  वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे. गोगोई  यांच 'आयएसआय'शी संबंध असल्याच्या आरोपांना गोगोई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. " हा संबंध जोडणे ही मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातील कल्पना आहे," असे म्हणत गोगोई यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

गोगोई म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयाचे राजकारण करणे हे मुख्यमंत्र्यांच्या 'असुरक्षित' मानसिकतेचे लक्षण आहे.  

‘केवळ आश्वासने देत नाही’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, एसआयआरमुळे महिलांसह अनेक घटकांवर परिणाम होत आहे. त्यांची नावे मतदारयादीतून वगळली जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून प. बंगालमध्ये २२० लोकांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टींची उत्तरे भाजपला द्यावी लागतील. आमचा तृणमूल काँग्रेस पक्ष केवळ आश्वासने देत नाही तर ती पूर्णही करतो.

‘मतदानाचे हक्क काढून घेत आहेत, नंतर नागरिकत्वही रद्द करतील’  

मयनागुडी : आज हे लोक मतदानाचे हक्क काढून घेत आहेत, उद्या एनआरसीच्या माध्यमातून नागरिकत्वही रद्द करण्याची शक्यता आहे. भाजप आणि केंद्र सरकार संविधानाचे पालन करत नाहीत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

Web Title : गोगोई ने सरमा के पाकिस्तान कनेक्शन के दावे को 'उपजाऊ कल्पना' बताया।

Web Summary : गौरव गोगोई ने असम के मुख्यमंत्री सरमा के आईएसआई से संबंध के आरोपों का खंडन किया। गोगोई ने इसे सरमा की कल्पना बताया। ममता बनर्जी ने भाजपा की आलोचना करते हुए पश्चिम बंगाल में मतदाताओं के मताधिकार छीनने और संभावित नागरिकता रद्द करने का आरोप लगाया।

Web Title : Gogoi slams Sarma's Pakistan link claim as 'fertile imagination'.

Web Summary : Gaurav Gogoi refuted Assam CM Sarma's allegations of ISI links. Gogoi called it a figment of Sarma's imagination. Mamata Banerjee criticized BJP, alleging voter disenfranchisement and potential citizenship revocation in West Bengal.