शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कराचीत पुन्हा दहशतवादी हल्ला

By admin | Updated: June 11, 2014 00:10 IST

तालिबानच्या दहशतवाद्यांनी कराची विमानतळाजवळ मंगळवारी पुन्हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्याने ते पळून गेले.

कराची विमानतळाजवळ पुन्हा तालिबानींचा हल्लाप्राणहानी नाही: प्रतिकार होताच दहशतवादी फरारकराची : तालिबानच्या दहशतवाद्यांनी कराची विमानतळाजवळ मंगळवारी पुन्हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्याने ते पळून गेले. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यास ३२ तासही उलटले नसताना पुन्हा हल्ला झाला. यामुळे शहरातील लोक धास्तावून गेले आहेत. विमानतळावरील हल्ल्यात ४० जणांचा बळी गेला होता. विमानतळाजवळील एअरपोर्ट सेक्युरिटी फोर्स अकॅडमीतील (एएसएफ) एका प्रशिक्षण केंद्रास दहशतवाद्यांनी ताज्या हल्ल्यात लक्ष्य बनविले. मात्र, त्यांना सुरक्षा कडे तोडता आले नाही. सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरानंतर ते नजीकच्या रहिवासी भागामध्ये पळून गेले.तालिबानने या दुसर्‍या हल्ल्याचीही जबाबदारी स्वीकारली आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या मोहंमद गटाच्या ओमर खुरसानी याने टिष्ट्वटर अकाउंटवर आमच्या गटाने हा दुसरा हल्ला केल्याचे म्हटले आहे. एएसएफचे प्रवक्ते कर्नल ताहिर अली म्हणाले की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेताच दहशतवादी पळून गेले. पाच दहशतवादी एसएफच्या केंद्रात घुसले असून त्यांची सुरक्षा दलासोबत चकमक सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, अली यांनी हे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, वस्तुस्थिती अशी आहे की, दोन जण दुचाकीवरून सकाळी आमच्या केंद्राच्या एका प्रवेशद्वारावर आले आणि त्यांनी तेथे तैनात दोन महिला अधिकार्‍यांवर गोळीबार केला. मात्र, आमच्या सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत जागा घेताच त्यांनी नजीकच्या पेहलवान गोथ वस्तीत पळ काढला. परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणाखाली असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी निमलष्करी दले व पोलिसांनी आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानी लष्करही हेलिकॉप्टरमधून टेहळणी करत आहे, असेही ते म्हणाले. मंगळवारचा हल्ला झालेल्या भागाचा दहशतवाद्यांनी रविवारच्या हल्ल्यात विमानतळात घुसण्यासाठी वापर केला होता. या हल्ल्यात ४० जण ठार झाले होते. मृतांत निमलष्करी व पोलीस दलाचा प्रत्येकी एक कर्मचारी, ११ विमानतळ सुरक्षारक्षक, १४ नागरी कर्मचारी आणि १० दहशतवाद्यांचा समावेश होता. विमानोड्डाणे विस्कळीतदहशतवाद्यांनी सकाळी एएसएफच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केल्यानंतर जिन्ना विमानतळावरील प्रवासी व अभ्यागतांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. परिणामी विमानोड्डाणाचे वेळापत्रक विस्कळीत झाले, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने सांगितले. काही उड्डाणे विस्कळीत झाली तर दुबईला जाणारे एक परदेशी विमान वेळेवर रवाना होऊ शकले नाही. मात्र आता विमानतळ व धावप˜ी सुरक्षा दलाच्या नियंत्रणाखाली असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. (वृत्तसंस्था)