‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:01 IST2025-05-22T07:00:33+5:302025-05-22T07:01:54+5:30

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. २००६ मध्ये वेरूळ येथे १० एके ४७ रायफल्स, गोळाबारूदसह आरडीएक्स पकडण्यात आले होते.

RAW officials in Marathwada after 'Operation Sindoor'; Central government begins review of internal security | ‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू

‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू केले आहे. ‘ॲापरेशन सिंदूर’नंतर सुरू झालेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातील संशयित स्लीपर सेलच्या हालचालींचा आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. २००६ मध्ये वेरूळ येथे १० एके ४७ रायफल्स, गोळाबारूदसह आरडीएक्स पकडण्यात आले होते. यात बीडच्या जबियोद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याचा सहभाग होता. त्यानेच कसाबला हिंदी भाषा शिकवली होती. त्याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने यूएई येथून आणले. तो लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. 

या पथकाने संशयित व्यक्ती, संभाव्य स्लीपर सेल यांच्या माहितीबरोबरच संवेदनशील ठिकाणांना (व्हायटल इन्स्टाॅलेशन) भेटी देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्याचेही समजते. स्लीपर सेल ॲक्टिव्हेट झाल्यास नुकसान पोहोचू शकणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  

संवेदनशील ठिकाणांना भेटी
जागतिक वारसा असलेल्या वेरूळ, अजिंठासह जायकवाडी धरण आणि  नांदेडमधील गुरुद्वारा, परळी वैजनाथ व घृष्णेश्वर येथे त्यांनी भेटी दिल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासनाकडून स्वतंत्रपणे सर्व व्हायटल इन्स्टाॅलेशन्सच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 
अशीच कारवाई राज्याच्या इतर भागांतही सुरू असल्याचे समजते. मराठवाड्यात यापूर्वी सिमी व नंतर पीएफआय सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. 
काहींचे ‘इसीस’शी संबंध उघडकीस आले आहेत. एनआयए व राज्य दहशतवादविरोधी पथकांनी मराठवाड्यातील अनेक ठिकाणी छापे मारून अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: RAW officials in Marathwada after 'Operation Sindoor'; Central government begins review of internal security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.