शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ शस्त्रक्रियेत दोन भाग जोडत बनले नवे यकृत

By admin | Updated: September 28, 2015 02:49 IST

कुटुंबातील दोन सदस्यांनी दान दिलेले यकृताचे दोन वेगवेगळे भाग जोडत ४६ वर्षीय रुग्णाला नवे यकृत देण्याची दुर्मिळ तेवढीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : कुटुंबातील दोन सदस्यांनी दान दिलेले यकृताचे दोन वेगवेगळे भाग जोडत ४६ वर्षीय रुग्णाला नवे यकृत देण्याची दुर्मिळ तेवढीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडण्याची किमया सर गंगाराम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पार पाडली.यकृत अवयवदानाच्या या अनोख्या प्रयोगाने रुग्णाला नवे आयुष्यही लाभले आहे. प. बंगालचे रहिवासी समीर मित्रा हे गेल्या तीन वर्षांपासून ‘क्रिप्टोजेनिक सिरोसीस’ या आजाराने पीडित होते. हा त्रास वाढल्यानंतर त्यांनी अनेक रुग्णालयांत तपासण्या केल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाखेरीज पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. समीर यांचे वजन ९३ किलो असल्याने समस्या बिकट बनली होती. कारण योग्य यकृत मिळत नव्हते. कारण शरीराच्या वजनानुसार यकृताचा मेळ साधला जात नव्हता.सामान्य व्यक्तीचे यकृत त्याच्या वजनाच्या शरीराच्या तुलनेत केवळ दोन टक्के वजनाचे असते. प्रत्यारोपण करताना रुग्णाच्या एकूण वजनाच्या किमान ०.८ टक्के वजनाच्या यकृताची गरज असते. हे प्रमाण पाहता समीर यांना ७३० ग्रॅम वजनाचे यकृत हवे होते, असे ज्येष्ठ यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. नैमीष मेहता यांनी सांगितले.अडचणींवर मातसमीर यांच्या पत्नी आणि मुलांचे यकृत वजनाच्यादृष्टीने जुळून आले मात्र त्यांचा रक्तगट वेगळा होता. त्यामुळे ते अपात्र ठरले. त्यांचे एक मेहुणे यकृत द्यायला समोर आले पण त्यांना एकच किडनी असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या यकृताचा मोठा भाग घेण्याची जोखीम पत्करली नाही. मेहुण्याच्या पत्नीचा रक्तगट जुळून आला मात्र वजन केवळ ४५ किलोच होते. त्यांच्या यकृताचा उजवीकडील अर्धा भाग ५४० ग्रॅम वजनाचा होता. उर्वरित २२० ग्रॅम वजनाचा भाग मेहुण्याच्या यकृतातून मिळविण्यात आला. यकृताचे दोन्ही भाग जोडत रक्तवाहिन्या जोडत कार्य सुरळीत करण्यात आले. दोन भाग जोडणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते, असे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ.शशांक पांडे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी सरकारच्या अधिकृत समितीकडून विशेष परवानगी घ्यावी लागली. २९ आॅगस्ट रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. समीर यांना तीन आठवड्यानंतर सुटी देण्यात आली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. (वृत्तसंस्था)