शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

रणथंबोरला ६५ कोटींचे उत्पन्न देणारी ‘मछली’ गेली!

By admin | Updated: August 19, 2016 05:27 IST

जिवंत दंतकथा बनलेली रणथंबोर अभयारण्यातील वाघीण ‘मछली’ने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ती जगातील सर्वाधिक वयाची जंगली वाघीण होती. दीर्घ काळापासून आजारी

जयपूर : जिवंत दंतकथा बनलेली रणथंबोर अभयारण्यातील वाघीण ‘मछली’ने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ती जगातील सर्वाधिक वयाची जंगली वाघीण होती. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोरमधील मछलीने गेल्या पाच दिवसांपासून अन्न वर्ज्य केले होते. मृत्युसमयी ती १९ वर्षांची होती. वाघांचे सरासरी आयुर्मान १४ ते १५ वर्षे आहे. मछलीमुळे गेल्या दहा वर्षांपासून रणथंबोर अभयारण्याला दरवर्षी ६५ कोटी रुपयांचा पर्यटन महसूल मिळत होता.नाव असे का?या वाघिणीला मछली हे नाव तिच्या चेहऱ्यावरील खुणेमुळे मिळाले होते. ही खूण माशासारखी दिसत असल्यामुळे सर्व जण तिला मछली म्हणत. तथापि, टी-१६ या नावानेही ती ओळखली जाई. लोकप्रिय राणी : जगात सर्वाधिक छायाचित्रण झालेली ती पहिली जंगली वाघीण होती. ती एवढी लोकप्रिय झाली होती की, तिच्यावर टपाल तिकीट काढण्यासह अनेक माहितीपटांची निर्मितीही करण्यात आली. फेसबुकवर तिला वाहिलेली अनेक पाने असून, वन्यजीवप्रेमी याच पानांच्या माध्यमातून तिच्या हालचालींचा मागोवा घेत असत. पाच दिवसांपासून होती आजारीमछली अमा घाटी परिसरात पाच दिवसांपूर्वी आजारी अवस्थेत आढळून आली होती. तिच्या सभोवतीच्या परिसर सुरक्षित करून वन कर्मचारी तिला मांस भरविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, तिची प्रकृती सुधारली नाही. गुरुवारी सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.काही वर्षांपूर्वी मगरीसोबत झालेल्या लढाईत मछलीने तिचे सर्व सुळे गमावले होते. ती जिवंत राहावी यासाठी तिला माशांचे खाद्य दिले जात होते. वनरक्षकांची एक समर्पित तुकडी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे.