शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात; ...तर आत्महत्या करीन; राकेश टिकैत यांची सरकारला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 19:45 IST

आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार होतो. मात्र, भाजप आमदारांनी आमच्या लोकांसोबत मारहाण केली आहे. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही येथून जाणार नाही. आम्ही येथेच बसणार.

नवी दिल्ली -शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी आता आत्महत्येची धमी दिली आहे. माध्यमांसोबत बोलताना ते रडत म्हणाले, जर तीनही कृषी कायदे मागे घेतले नाही, तर मी आत्महत्या करीन. मला काही झाले, तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. एवढेच नाही, तर मी शेतकऱ्यांना बर्बाद होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मारण्याचे शडयंत्र होत आहे. हा अत्याचार होत आहे.

प्रशासन आणि टिकैत यांची चर्चा फेल - गाझीपूर बॉर्डरवर प्रशासन आणि राकेश टिकैत यांच्यातील चर्चा फेल झाली आहे. यानंतर राकेश टिकैत यांनी आरोप केला आहे, की भाजप आमदार पोलिसांसोबत आले आहेत. आता यांची दादागिरी चालणार नाही.

भाजपवर राकेश टिकैत यांचा मोठा आरोप -गाझीपूर बॉर्डरवर राकेश टिकैत म्हणाले, आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार होतो. मात्र, भाजप आमदारांनी आमच्या लोकांसोबत मारहाण केली आहे. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही येथून जाणार नाही. आम्ही येथेच बसणार.

गाझीपूर बॉर्डरला छावणीचं स्वरूप -गाझीपूर बॉर्डरवर सध्या मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाचे चमूही आंदोलन स्थळावर उपस्थित आहेत. याशिवाय स्थानिक लोकही येथे जमले असून त्यांनी रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये -ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये -आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज लावला. या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर आता दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPoliceपोलिसdelhi violenceदिल्ली