शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या अधिकार विधेयकाला ४५ वर्षांनंतर राज्यसभेत मंजुरी

By admin | Updated: April 24, 2015 19:00 IST

तृतीयपंथीयांच्या अधिकारासंदर्भात असलेले व ४५ वर्षापासून रखडलेले विधेयक गुरुवारी राज्यसभेत एकमताने मंजुर करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २४ - तृतीयपंथीयांच्या अधिकारासंदर्भात असलेले व ४५ वर्षापासून रखडलेले विधेयक गुरुवारी राज्यसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. समाजात वावरताना स्त्री आणि पुरुषाप्रमाणेच तृतीयपंथीयांना सुध्दा चांगली वागणूक मिळावी. तृतीयपंथीयांनाही समान अधिकार असलेल्या विधेयकाला १९७० साली संसद सभागृहात सर्वप्रथम मांडण्यात आले होते. परंतू हे विधेयक गेल्या ४५ वर्षापासून राज्यसभेत धूळखात पडून होते. 'द राईट्स ऑफ ट्रान्सजेंडर्स पर्सन बिल झ्र २०१४' असे नाव असलेल्या या विधेयकामुळे तृतीयपंथीयांना अधिकार बहाल करता येवू शकणार आहेत. मानवी अधिकार हा सर्वांसाठी समाना असला पाहिजे पण आजही तृतीयपंथीयांकडे दूर्लक्ष केले जात आहे. जगातील अनेक देशात यासंदर्भात पावले उचलली आहेत मग भारतात का नाही उचलण्यात येत असा प्रश्न विचारला. त्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आले. हे विधेयक राज्यसभेत एकमताने मंजुर करण्यात आल्याची घोषणा करतानाच हे विधेयक राज्यसभेत एकमताने मंजुर होणे ही दुर्मिळ घटना आहे असे मत राज्यसभेचे उपसभापती पीजी कुरीयन यांनी व्यक्त केले. या विधेयकामुळे तृतीयपंथीयांना समान दर्जा मिळणार असून त्यांचा अधिकार अबाधीत राहावा यासाठी राष्ट्रीय आयोग तसेच राज्यस्तरावरील आयोग स्थापन करता येवू शकणार आहेत.