शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या दिवशीही राज्यसभा ठप्प

By admin | Updated: December 18, 2014 05:04 IST

बळजबरीने करण्यात आलेले धर्मांतर आणि सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर

नवी दिल्ली : बळजबरीने करण्यात आलेले धर्मांतर आणि सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, या मागणीवर समस्त विरोधी पक्ष ठाम राहिल्याने आणि सरकारने ही मागणी अमान्य केल्याने सलग तिसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले. या दरम्यान काँग्रेसचे सदस्य हनुमंता राव यांना नियम २५५ अन्वये संपूर्ण दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान गदारोळामुळे राज्यसभेत विमा विधेयक मांडण्यात सरकारला अपयश आले. आता हे विधेयक लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा सरकार विचार करीत असल्याचे समजते.राज्यसभेत प्रचंड गदारोळातच विमान अपहरण निवारण दुरुस्ती विधेयक २०१४ ध्वनी मताने मंजूर करण्यात आले. तसेच दुसरे एक संबंधित विधेयक मागे घेण्यात आले. पंतप्रधान उपस्थित राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यसभेत हजर राहणार आहेत, असे संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. परंतु ते धर्मांतर वा सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावर उत्तर देणार किंवा काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)