शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवारांची घोषणा; कोणाला संधी? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 20:29 IST

Rajya Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

Rajya Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आरपीएन सिंग आणि सुधांशू त्रिवेदी यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधून आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने सुभाष बराला यांना हरियाणातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांना उत्तराखंडमधून राज्यसभेचे उमेदवार केले आहे. याशिवाय, बिहार भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरमशीला गुप्ता यांनाही उमेदवारी दिली आहे. पक्षाने नितीश कुमार यांचे माजी सहकारी भीम सिंह यांनाही उमेदवारी दिली आहे.

पाहा यादी:

  1. धर्मशीला गुप्ता (बिहार)
  2. डॉ. भीम सिंह (बिहार)
  3. राजा देंवेंद्र प्रताप सिंह (छत्तीसगड)
  4. सुभाष बराला (हरियाणा)
  5. नारायाणा कृष्णासा भांडगे (कर्नाटक)
  6. आरपीएन सिंह (यूपी)
  7. डॉ. सुधांशु त्रिवेदी (यूपी)
  8. चौधरी तेजवीर सिंह (यूपी)
  9. साधना सिंह (यूपी)
  10. अमरपाल मौर्य (यूपी)
  11. संगीता बलवंत (यूपी)
  12. नवीन जैन (यूपी)
  13. महेंद्र भट्ट (उत्तराखंड)
  14. समिक भट्टाचार्य (पश्चिम बंगाल)

उत्तर प्रदेशात 7 जागांवर निवडणूक, दोन महिलांना संधीउत्तर प्रदेशात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. या सात उमेदवारांपैकी दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने साधना सिंह आणि डॉ.संगीता बलवंत यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरण आणि नारी शक्ती वंदन कायद्याशीही या यादीचा संबंध जोडला जात आहे. 

टीएमसीनेही उमेदवार जाहीर केलेआजचं तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने पत्रकार सागरिका घोष, नदीमुल हक ,सुष्मिता देव आणि ममता बाला ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.

किती जागांवर निवडणूक

या वर्षी राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. यापैकी 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला पूर्ण झाला आहे, तर आणखी 65 सदस्य निवृत्त व्हायचे आहेत. या 65 सदस्यांपैकी 55 सदस्य 23 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर राज्यसभेच्या ७ खासदारांचा कार्यकाळ 2 ते 3 एप्रिल दरम्यान पूर्ण होणार असून 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.

भाजपचे 32 खासदार निवृत्त होत आहेतनिवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. यंदा भाजपच्या 32 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानंतर काँग्रेसचे 11 खासदार निवृत्त होणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे 4 आणि बीआरएसच्या 3 खासदारांचा समावेश आहे. याशिवाय जेडीयू, बीजेडी आणि आरजेडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त होत आहेत. एनसीपी, सपा, शिवसेना, टीडीपी, वायएसआरसीपी, एसडीएफ, सीपीआय, सीपीआयएम आणि केरळ काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार या वर्षी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेश