नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली, तर हरिप्रसाद 105 मतं मिळवण्यात यश आलं. यावेळी एकूण 222 खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश सिंह विजयी झाल्याची घोषणा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरिवंश यांच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:31 IST