राजनाथ सिंह दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

By Admin | Updated: August 23, 2016 20:47 IST2016-08-23T20:47:58+5:302016-08-23T20:47:58+5:30

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्यापासून दोन दिवसांच्या काश्मीर दौ-यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात जनजीवन विस्कळीत झाले असून

Rajnath Singh on a two-day visit to Kashmir | राजनाथ सिंह दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

राजनाथ सिंह दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्यापासून दोन दिवसांच्या काश्मीर दौ-यावर आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात जनजीवन विस्कळीत झाले असून येथील उसळलेल्या हिंसाचारासंबंधी आढावा घेण्यासाठी उद्या म्हणजेच बुधवार आणि गुरूवार (ता. २४ आणि ता. २५) या दिवशी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह  काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये काश्मीरमधील प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या भेटी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह घेणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मीर दौ-यावर येणार असल्यामुळे ठिकठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. 
 

Web Title: Rajnath Singh on a two-day visit to Kashmir