शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
कुरुळी : निघोजे शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांची, तर उपाध्यक्षपदी मनीष तावरे, शिक्षक प्रतिनिधी सुनील कातोरे यांची निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक सत्यवान शितोळे यांनी दिली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे
कुरुळी : निघोजे शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांची, तर उपाध्यक्षपदी मनीष तावरे, शिक्षक प्रतिनिधी सुनील कातोरे यांची निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक सत्यवान शितोळे यांनी दिली. निघोजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, माध्यान्ह भोजन समिती, बांधकाम समिती या समित्यांची निवड करण्यात आली.शालेय व्यवस्थापन समितीवर निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षक प्रतिनिधी यांचा सत्कार सरपंच नीलम येळवंडे, उपसरपंच संतोष येळवंडे, मावळते अध्यक्ष संदीप येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आदर्श सरपंच कांचन शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, मा. सरपंच हिरामण येळवंडे, मा. उपसरपंच नामदेव शिंदे, ग्राम सदस्य कोंडिभाऊ येळवंडे, राधाबाई आल्हाट, बबन कान्हूकर, कैलास येळवंडे, ज्ञानेश्वर नाणेकर, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सुखदेव मुंगसे यांनी केले.फोटो ओळ : निघोजे शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षा यांचा सत्कार मावळते अध्यक्ष संदीप येळवंडे यांनी केला. (सर निघोजे जि. प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवडीची आपल्या अंकात जाहीरात आहे बातमी फोटोसह घ्यावी)