लव्हस्टोरीचा दुःखद अंत! 19 वर्षीय प्रियकर आणि प्रेयसीने एकाचवेळी संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 12:35 IST2023-03-12T12:34:49+5:302023-03-12T12:35:45+5:30

राजस्थानच्या डुंगरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajasthan's Dungarpur couple ended their lives at the same time    | लव्हस्टोरीचा दुःखद अंत! 19 वर्षीय प्रियकर आणि प्रेयसीने एकाचवेळी संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

लव्हस्टोरीचा दुःखद अंत! 19 वर्षीय प्रियकर आणि प्रेयसीने एकाचवेळी संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

डुंगरपूर : राजस्थानच्या डुंगरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डुंगरपूर जिल्ह्यातील धंबोला पोलीस स्टेशन परिसरात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मृत दोघेही एकाच गावातील रहिवासी असून, दोघांमध्ये सुमारे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, डुंगरपूर जिल्ह्यातील धंबोला पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सकाळी डुक पंचायतीच्या कांक्री येथील शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला एक मुलगा आणि मुलीचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

प्रेमीयुगुलाने एकाचवेळी संपवलं जीवन 
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अधिक माहिती समोर आली. कांक्री टेंबा फाळा येथील 19 वर्षीय ईश्वर डामोर आणि 17 वर्षीय हीना डामोर अशी मृतांची ओळख पटली आहे. घटनेची माहिती मिळताच मृताचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. ईश्वर आणि हीना यांच्यात सुमारे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. हीना शुक्रवारी सायंकाळी बहिणीसोबत घरातून निघाली होती. यादरम्यान तिची बहीण घरी परतली पण हीना घरी परतली नाही.

पोलिसांकडून गुन्हा दाखल 
तर, ईश्वर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास जेवण करून घराबाहेर पडला होता. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी प्रेमी युगुलाचे मृतदेह खाली उतरवले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Rajasthan's Dungarpur couple ended their lives at the same time