रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:21 IST2025-09-30T16:18:25+5:302025-09-30T16:21:28+5:30

Govt cough syrup controversy: राजस्थान आणि मध्य प्रदेशात सरकारी रुग्णालयांमधून मोफत वितरीत करण्यात आलेल्या खोकल्याच्या सिरपमुळे मोठी खळबळ उडाली

Rajasthan Shocker: Death of Child Linked to Free Cough Syrup; Officials Stop Distribution Pending Probe | रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!

रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!

राजस्थान आणि मध्य प्रदेशात सरकारी रुग्णालयांमधून मोफत वितरीत करण्यात आलेल्या खोकल्याच्या सिरपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे सिरप पिल्यानंतर राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात एका ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तर, भरतपूरमध्ये एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

मृत मुलगा पाच वर्षाचा असून त्याला २९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास खोकल्याचे औषध देण्यात आले. रात्री ३:३० वाजता त्याला उचकी लागली. आईने पाणी दिले, पण सकाळी त्याने डोळे उघडले नाहीत. कुटुंबीयांनी त्याला सिकर येथील एसके रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताचा काका बसंत शर्मा यांनी सिरप दिल्यानंतरच प्रकृती बिघडल्याचा दावा केला आहे. तर, एसके रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. केके अग्रवाल यांनी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले आहे.

भरतपूर जिल्ह्यातही सरकारी आरोग्य केंद्रातून मिळालेले खोकल्याचे औषध पिल्याने ३ वर्षांच्या मुलाची प्रकृती खालावली. हे औषध पिल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि त्याचे हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले. त्याला ताबडतोब जयपूरमधील जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, बयाना येथील सीएचसीचे प्रभारी डॉ. ताराचंद योगी यांनी स्वतः हे सिरप पिऊन पाहिले, ज्यामुळे त्यांचीही प्रकृती बिघडली. खबरदारी म्हणून संबंधित खोकल्याचे औषधाचा पुरवठा आणि वितरण तात्काळ थांबवण्यात आले.

या खोकल्याच्या औषधामुळे देशभरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली असून, प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Web Title : कफ सिरप से बच्चे की मौत, एक अन्य गंभीर हालत में।

Web Summary : राजस्थान में मुफ्त कफ सिरप पीने से 5 साल के बच्चे की मौत हो गई, जबकि एक अन्य बच्चा गंभीर है। मौत के सही कारणों का पता लगाने के लिए जांच जारी है। एहतियात के तौर पर सिरप का वितरण रोक दिया गया है।

Web Title : Cough Syrup Suspected in Child's Death, Another Critical.

Web Summary : A 5-year-old died in Rajasthan after consuming free cough syrup, while another child is critical. Investigations are underway to determine the exact cause. Distribution of the syrup has been halted as a precaution.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.