शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

Rajasthan Political Crisis: काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले, कारवाईवर पायलट पहिल्यांदाच व्यक्त झाले; म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 2:38 PM

Rajasthan Political Crisis: पक्षानं प्रदेशाध्यक्षपदासह उपमुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

जयपूर: आपल्याच सरकारविरोधात बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांना काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक आमदारांना देण्यात आलेली मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झाले आहेत. पक्षानं केलेल्या कारवाईवर सचिन पायलट यांनी अद्याप माध्यमांशी संवाद साधलेला नाही. मात्र त्यांनी ट्विट करून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. (Rajasthan Political Crisis) गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र यावर पायलट यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र गेल्या चार दिवसांत त्यांनी पहिल्यांदाच ट्विट केलं आहे. त्यातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'सत्याला त्रास दिला जाऊ शकतो. मात्र ते पराभूत होऊ शकत नाही,' असं पायलट यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता पायलट नेमकं काय करणार, ते नवा पक्ष स्थापन करणार की भाजपासोबत जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. 'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत सुरजेवाला यांनी पायलट आणि भाजपा यांचा समाचार घेतला.सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. 'आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचं सांगण्यात आलं. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही,' असं सुरजेवाला यांनी सांगितलं.पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला. पायलट करत असलेली कृती स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आम्हाला अतिशय दु:खद अंतकरणानं काही निर्णय घ्यावे लागले, असं म्हणत सुरजेवाला यांनी पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय‘ते’ २२ आमदार गेले कुठे?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसचं टेन्शन वाढलं

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत