शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:56 PM

Rajasthan Political Crisis: भाजपामध्ये जाणार नसल्याचा पायलट यांच्याकडून पुनरुच्चार; पायलट यांना काँग्रेसकडून साद

जयपूर: पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केले आहेत. पायलट यांच्यासाठी पक्षानं दरवाजे बंद केलेले नाहीत, अशा शब्दांत राजस्थानकाँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेंनी पायलट यांना साद घातली आहे. काँग्रेसनं कालच पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. या कारवाईनंतरही पायलट यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसनं त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. (Rajasthan Political Crisis)राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेंनी ट्विट करून पायलट यांच्याबद्दलची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 'पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. देवानं त्यांना सद्भुद्धी द्यावी आणि त्यांना त्यांची चूक लक्षात यावी. भाजपाच्या जाळ्यातून त्यांनी बाहेर यावं, अशी माझी प्रार्थना आहे', असं पांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून काँग्रेस पायलट यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची काल काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. 'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी पायलट यांच्यावरील कारवाईची माहिती दिली.राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णयतुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

टॅग्स :Rajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेसJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRajeev Satavराजीव सातव