Video: NEET ची तयारी करणारी विद्यार्थिती कोचिंग सेंटरच्या छतावर चढली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:08 IST2025-08-30T15:07:44+5:302025-08-30T15:08:26+5:30
Rajasthan News: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: NEET ची तयारी करणारी विद्यार्थिती कोचिंग सेंटरच्या छतावर चढली अन्...
Rajasthan News: राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका कोचिंग सेंटरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. NEET ची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने अचानक इमारतीच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी जमली. कोचिंग स्टाफच्या विवेकबुद्धीमुळे तरुणीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, NEET ची तयारी करणाऱ्या एका तरुणीने अचानक कोचिंग सेंटरच्या उंच इमारतीवर चढून उडी मारण्याची धमकी दिली. तरुणी बऱ्याच काळापासून नैराश्येत होती आणि कोचिंग चाचण्याही देऊ शकला नव्हती. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास, तरुणी अचानक कोचिंग सेंटरच्या छतावर पोहोचली आणि काठावर उभी उडी मारण्याची धमकी देऊ लागली. या घटनेमुळे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये एकच खळबळ उडाली. कोचिंग स्टाफने तातडीने तत्परता दाखवली आणि काही वेळातच विवेकबुद्धी दाखवून तिला सुरक्षितपणे खाली आणले.
मित्रों, जयपुर के एक कोचिंग सेंटर का यह वीडियो क्या कहना चाहता है ??
— Shailendra Sharma (@shailaryan007) August 30, 2025
जयपुर में NEET छात्रा ने की आत्महत्या की कोशिश,
कोचिंग स्टाफ ने इस तरह बचाई जान, देखें VIDEO
राजधानी में शुक्रवार को गोपालपुरा क्षेत्र में स्थित एक कोचिंग इंस्टीट्यूट में नीट (NEET) की तैयारी कर रही एक छात्रा… pic.twitter.com/3SR3xZyn9S
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनी कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या छतावर असल्याचे दिसून येते. तिथे ती पॅरापेटवर उभी राहून उडी मारण्याची धमकी देतेय. तर, अनेकजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच विद्यार्थिनीला समजावून खाली उतरवले नसते, तर मोठी घटना घडली असती.
पोलिस अधिकारी गुंजन वर्मा यांनी सांगितले की, तरुणीच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिल्यानंतर ते तातडीने जयपूरला पोहोचले आणि तिला घरी घेऊन गेले. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.